पक्षप्रमुखांच्या शपथविधीसाठी जिल्ह्यातून हजारो शिवसैनिक शिवतीर्थावर


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज सायंकाळी मुंबईत शिवाजी पार्क येथे शपथ घेणार असल्याने राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी गुरुवारी सकाळी नगरमधून शेकडो शेतकरी, शिवसैनिक मुंबईच्या दिशेने सकाळी रवाना झाले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व शिवसैनिकांचा मोठा जथ्था सकाळी मुंबईकडे मार्गस्थ झाला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, अनिल कराळे, सभापती रामदास भोर, नगर तालुका प्रमुख राजेंद्र भगत, प्रविण गोरे, रफीक शेख, अनिल गोरे, नारायण कडूस आदी उपस्थित होते.

प्रा.शशिकांत गाडे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरणार असल्याने शिवसेनेसाठी आजचा शपथविधी सोहळा ऐतिहासिक असणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पाहणे यासारखा दुसरा आनंद शिवसैनिकांसाठी नाही. महाविकास आघाडीचे हे सरकार महाराष्ट्रात खर्‍या अर्थाने रयतेचे राज्य आणेल. सर्वसामान्य शेतकरी मोठ्या आशेने या सरकारकडे पाहत असून शेतकरी वर्गातून या नव्या सरकारचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे. शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्यासाठी त्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन शिवसेनेने दिलेले आहे. हे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे निश्चितच पूर्ण करतील असा विश्वास आहे. शिवसेनेसाठी हिच ती वेळ असून आजची पहाट शिवशाहीच्या उदयाची पहाट आहे, अशी प्रतिक्रिया प्रा.गाडे यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post