त्रासलेले नगरकर सह्यांच्या मोहिमेस उस्फुर्त प्रतिसाद


माय नगर वेब टीम
अहमदनगर – नगरमधील सर्व रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, नागरिकांच्या सहनशीलतेच अंत झाला आहे. मनपा, सार्वजनिक बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयाचा अभाव व नियोजन नसल्याने ज्येठ नागरिक, विद्यार्थी, महिला व प्रवाश्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

तात्पुरती डागडुजी करून रस्त्यांचे प्रश्न मिटणार नाहीत, यासाठी नगरकरांना पुढाकार घ्यावा लागेल म्हणूनच ‘प्रश्न नगरचा ग्रुप’ तर्फे या विषयी त्रस्त नगरकरांच्या सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली. दिल्लीगेट परिसरात यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या सर्व सह्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात येणार आहे.

प्रश्न नगरचा या ग्रुप तर्फे या पुढे नगरच्या विविध प्रश्नावर लक्ष वेधून कार्य करणात येणार असून, नगरकरांनी त्यांच्या समस्या मोकळेपणाने व्यक्त कराव्यात यासाठी हे उत्तम व्यासपीठ उपलब्ध करण्यात आले असल्याचे बहीरनाथ वाकळे यांनी सांगितले आहे. या उपक्रमासाठी गायत्री झंवर, स्मिता जाखोटिया, संध्या मेढे, अरविंद मूनगेल, आतुल गायकवाड, महेश कुलकर्णी, ओंकार कोकाटे, तुषार सोनवणे, अरुण थिटे, राजू मंगलारम, सचिन गायकवाड, गिरीश मुळे, बाळासाहेब सागडे, लहू लोणकर, शंकर गोरे, यांनी विशेष परिश्रम घेतले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post