फडणवीस यांना न्यायालयाने बजावला समन्स



माय अहमदनगर वेब टीम
नागपूर - राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर सत्र न्यायलयाकडून समन्स बजावण्यात आला आहे. 2014 मधील विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी समन्स बजावण्यात आला आहे. नागपूर पोलिसांनी काल फडणवीस यांच्या निवासस्थानी हे समन्स पाठवले. राज्यात एकीकडे महाविकासआघाडीचे सरकार आले, तर दुसरीकडे फडणवीसांना समन्स पोहचला.


सतीश वकील उके यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात या दोन्ही गुन्ह्यांची माहिती लपवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. फडणवीस यांच्याविरोधातील बदनामी आणि फसवणूक असे दोन्ही गुन्हे नागपूरमधील आहेत. या प्रकरणाबाबत खुलासा न केल्याच्या आरोपाखाली दंडाधिकारी न्यायालयाकडे एक नोव्हेंबरला फौजदारी कारवाई करण्याचा अर्ज दाखल झाला होता.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post