मंत्रिपदाची शपथ घेणार नाहीत - अजित पवार
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - 'राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज फक्त छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांचा शपथविधी होईल. मी आज शपथ घेणार नाही,' असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज स्पष्ट केलले.
स्वपक्षाविरोधात बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन करणाऱ्या व एकाकी पडल्यानंतर राजीनामा देऊन पुन्हा परतलेले अजित पवार यांची नाराजी अद्यापही कायम असल्याचं बोललं जातं. नव्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद घ्यावं, असा त्यांचा सुरुवातीपासून आग्रह आहे. मात्र, उद्धव ठाकरे हे पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील, असं तूर्त तरी ठरलं आहे. तर, राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद व काँग्रेसला विधानसभा अध्यक्ष असं वाटप झालं आहे. असं असलं तरी अजित पवार अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर ठाम आहेत. याच अनुषंगानं आज शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. त्या चर्चेनंतर अजित पवार स्वत: पत्रकारांशी बोलले.
Post a Comment