इस्रोच्या ‘कार्टोसेट 3’ इमेज सॅटेलाइटचे यशस्वी प्रक्षेपण




माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - पृथ्वीचे भूपृष्ठीय निरीक्षण आणि उच्च दर्जाची छायाचित्रे टिपणाऱ्या कार्टोसॅट-३ या उपग्रहासह अमेरिकेच्या १३ अन्य व्यावसायिक नॅनो उपग्रहांचे आज सकाळी ९.२८ वाजता यशस्वी प्रक्षेपण झाले.

या प्रक्षेपणावेळी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चे प्रमुख के. सिवन श्रीहरिकोटा मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये उपस्थित होते. त्यांच्यासोबत या मिशनचे इंजिनीअर्स आणि इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ उपस्थित होते. चांद्रयान २ नंतरचं इस्रोचं हे पहिलंच लाँच आहे.

दरम्यान इस्त्रोकडून आज अवकाशातून पृथ्वीची छायाचित्र टिपण्यासाठी सॅटलाईट कार्टोसेट ३ आणि अमेरिकेच्या १३ कमर्शियल नॅनो सॅटलाईट्ला पीएसएलवी सी ४७ (PSLV-C47)ला आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर शार येथून लॉन्च करण्यात आले आहे. पीएसएलव्ही सी ४७ आज सकाळी ९. २८ च्या दरम्यान कार्टोसेट ३ आणि १३ कमर्शिअल नॅनो सॅटेलाईटसह झेपावले आहे.

इस्त्रो द्वारा करण्यात आलेल्या ट्वीटनुसार, पीएसएलव्ही सी ४७ एक्सएल कॉन्फ्रिगेशन मध्ये पीएसएलव्ही चे हे २१ वे उड्डाण आहे. श्रीहरिकोटा स्थित एसडीएससी शार द्वारा ७४ व्या प्रक्षेपण यानाचे हे मिशन आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post