माय नगर वेब टीम
अहमदनगर - निमगाव वाघा येथे नवनाथ विद्यालय, स्व.किसन डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने प.पू. श्री निर्मला माताजी प्रणित सहजयोग मेडीटेशन ध्यान धारणा शिबीर पार पडले. यामध्ये विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक विषयावर मार्गदर्शन करुन आनंदी व निरोगी जीवनासाठी सहजयोगाचे महत्त्व सांगण्यात आले. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक सहभागी झाले होते.
सहजयोग मेडीटेशन ध्यान धारणा शिबीराचे प्रारंभ सुर्यनमस्काराने झाली. यावेळी शिबीराचे मार्गदर्शक जितेंद्र रसाळकर, अनंत रोहोकले, उज्वला दिमोटे, शाळेचे प्र.मुख्याध्यापक किसन वाबळे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, काशीनाथ पळसकर, निलकंठ वाघमारे, दत्तात्रय जाधव, चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, शुभांगी धामणे, मंदा साळवे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, संतोष फलके, प्रतिभा डोंगरे, लहानबा जाधव आदींसह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जितेंद्र रसाळकर यांनी आत्मज्ञान प्राप्तीसाठी सहजयोग मेडीटेशन ध्यान धारणा शिबीर सर्वोत्तम पर्याय आहे. शरीरातील सुप्त चैतन्यशक्ती सहजयोगद्वारे जागृत होऊन साधकांच्या जीवनात आनंद व समाधान निर्माण होते. धावत्या तणावपुर्ण जीवनात मनुष्याला अनेक व्याधीने ग्रासले असून, व्याधी दूर करण्याची शक्ती सहजयोगमध्ये असल्याचे त्यांनी सांगून, विविध आसने प्रात्यक्षिकासह करुन दाखविले. तर सुक्ष्म शरीर पध्दतीच्या माहितीचा उलगडा त्यांनी केला. अनंत रोहोकले यांनी सुर्यनमस्काराची माहिती दिली. प्र.मुख्याध्यापक किसन वाबळे यांनी कुशाग्र बुध्दीमत्ता व एकाग्रतेसाठी सहजयोग विद्यार्थ्यांसाठी उत्तम असून याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार असल्याचे सांगितले. पै.नाना डोंगरे यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी बुध्दीमत्तेसह सदृढ आरोग्य महत्त्वाचे आहे. योगातून शरीर व मनाचे स्वास्थ्य उत्तम राहून जीवन आनंदी बनते. प्राचीन संस्कृतीत देखील याचे महत्त्व विशद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शाररीक, बौध्दिक व मानसिक आरोग्य टिकविण्यासाठी योग करण्याचे त्यांनी आवाहन केले.
Post a Comment