माय नगर वेब टीम
मुंबई: महाराष्ट्रातील राजकीय लढाईत पीछेहाट झाल्यानंतर भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. शरद पवारांनी भाजपवर डाव उलटवला अशी चर्चा असतानाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या घडामोडींवर मौन सोडलं आहे. 'अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते असल्यानं भाजपनं त्यांच्यावर विश्वास ठेवला होता,' असं शहा यांनी सांगितलं.
निवडणूक निकालानंतर राज्यात तब्बल महिनाभर रंगलेल्या राजकीय नाट्याचा काल शेवट झाला. भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांनी माघार घेऊन राजीनामा दिल्यामुळं भाजपचं सरकार अवघ्या ८० तासांत कोसळलं. त्यानंतर आता राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत आहे. नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे उद्या शपथ घेणार आहेत.
Post a Comment