उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला बंधू राज ठाकरेंची उपस्थिती, फोन करुन भावाला दिले होते निमंत्रण



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - आज महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक दिवस आहे. ठाकरे घराण्यातील पहिला व्यक्ती राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळणार आहे. या आनंदी क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपले बंधु आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रण दिले होते. ते आता राज ठाकरे मान्य केले आहे आणि आज होणाऱ्या शपथ विधीला ते उपस्थित राहणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवतीर्थ म्हणजेच शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत.

एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचा शब्द उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिला होता. ही वचनपूर्ती खुद्द उद्धव ठाकरे यांच्या रुपाने होणार आहे. कारण थेट शिवसेना पक्षप्रमुखच मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार आहेत. सोबतच आदित्य ठाकरे यांच्या रुपानेही ठाकरे घरण्यातील पहिला व्यक्ती निवडणूक सक्रिय राजकारणात सहभागी झाला आहे. राज ठाकरे शिवाजी पार्क परिसरात असलेल्या त्यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी राहतात. त्यामुळे शपथविधीला ते पत्नी, मुलगा, सून, मुलगी आणि मातोश्री यांच्यासह उपस्थित राहतील, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post