आ. जगतापांच्या भूमिकेकडे नगरकराचे लागले लक्ष




माय नगर वेब टीम
अहमदनगर  – राज्याच्या राजकारणात भूकंप घडला असतानाही नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सगळे म्हणजेच सहाही आमदार शरद पवार साहेबांमागे असल्याचा दावा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केला आहे. नगरचे आमदार संग्राम जगताप हे अजितदादांचे फॅन म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ते अजिदादांच्या भूमिकेशी सहमती दर्शवितात की शरद पवारांसोबत जातात याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील पक्षाचे बहुतांशी आमदार हे सायंकाळी होत असलेल्या वायबीसी सेंटरमधील बैठकीसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. या आमदारांशी संपर्क केला असता त्यातील काहींनी मुंबईतील बैंठकीनंतर आपली भूमिका स्पष्ट करू असे सांगितले. अजित पवार यांचे फॅन म्हणून ओळखले जाणारे नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी मात्र, संपर्क झाला नाही. यामुळे संग्राम जगताप यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहेत.

शनिवारी सकाळी अचानक मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. या निर्णयाची मतदारांना जशी कल्पना नव्हती तशी राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांना देखील कल्पना नसल्यीचो समजते. नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार आहेत. यापैकी सर्व आमदार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत असल्याचे जिल्हाध्यक्ष फाळके यांनी सांगितले.

राज्यातील सत्तेच्या शपथविधी कार्यक्रमाचे हादरे जिल्ह्यातील राष्ट्रवादीलाही बसले. अकोल्याचे आमदारर डॉक्टर किरण लहामटे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ‘मी तातडीने मुंबईकडे निघाले असल्याचे सांगितले. तर कोपरगावचे आशुतोष काळे आणि राहुरीचे प्राजक्त तनपुरे यांनी पक्षाची तातडीने दुपारी 4.30 ला होणार असून त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे मुंबईत असल्याने त्यांचीशी संपर्क झाला नाही.

रोहित पवार हेही मुंबईत असल्याने त्यांची संपर्क झाला नाही. पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी नेमके काय झाले हे मला अधिकृत पक्षाकडून सांगण्यात आलेले नाही. मला माध्यमातून माहिती मिळाली असून मी मुंबईकडे निघालो आहे. मी नवीन आमदार असल्याने या परिस्थितीबाबत भाष्य करू शकत नाही. मात्र, राष्ट्रवादी पक्ष एकसंघ राहणार असल्याचे सांगत त्यांनी पक्षासोबत राहण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, अजित पवार यांचे राजकीय फॅन समजले जाणारे नगर शहराचे आमदार संग्राम जगताप काय निर्णय घेणार याकडे सर्वाचे लक्ष राहणार आहे. त्यांची भूमिका काय? हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला, मात्र त्यांनी फोन कॉलला प्रतिसाद दिला नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post