ठाकरे सरकारने 'विश्‍वास' जिंकताच जिल्हयात महाविकास आघाडीने जल्लोष



माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - राज्यात नवीन समिकरणानुसार महाविकास आघाडीच्या वतीने आज विश्‍वासदर्शक प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव १६७ मतांनी ठाकरे सरकारने जिंकला आहे. विश्‍वासदर्शक ठराव जिंकताच अहमदनगर जिल्हयात यश पॅलेस चौकात फटाके वाजून पेढे वाटून शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला.

नगर जिल्हयात शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, शिवसेना उपनेते अनिल राठोड, गिरीष जाधव, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शहरप्रमुख दिलीप सातपुते, बाळासाहेब हराळ, माजी महापौर भगवान फुलसौंदर, राजु भगत, शरद झोडगे, बाळासाहेब बोराटे, सुभाष लोंढे, गोविंद मोकाळे, संतोष गेणाप्पा, दत्ता सप्रे, रामदास भोर, प्रविण कोकाटे, आशाताई निंबाळकर, सुशमाताई पडोळे, संगीता ससे, निर्मला धुपधरे, सोनल गोहर, निलेश भाकरे, अमोल येवले, हर्षवर्धन कोतकर, संग्राम शेळके आदी उपस्थित होते.


सभागृहात अशोक चव्हाण यांनी विश्‍वासदर्शक ठराव मांडला त्यास जयंत पाटील, सुनिल प्रभु, नवाब मलिक यांनी दिले. विश्‍वासदर्शक ठरावाच्या बाजूने 169 आमदारांनी पाठिंबा दिला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post