अहमदनगर- भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने मंगळवार दि.26 नोव्हेंबर रोजी मार्केटयार्ड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी सामुदायिक पध्दतीने संविधानाचे वाचन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब गायकवाड, म.रा. संघटक मोहनदादा ठोंबे, दीलीप आंग्रे, दत्तात्रय आडबल्ले, सुनील ससाणे, रमाताई पाचरणे, भगवान ठोंबे, बाळासाहेब गायकवाड, अरुण गायकवाड, करण पाचारणे, विश्वास गायकवाड, प्रकाश कांबळे आदी उपस्थित होते.
26 नोव्हेंबर 1949 रोजी भारत देशाला संविधान समर्पित करून देशाला एक नवीन संस्कृती बहाल करण्यात आली. संविधानाने देशाला एकात्मतेमध्ये जोडले असून, संविधान हा देशाचा गौरव असल्याचे मोहनदादा ठोंबे यांनी सांगितले.
Post a Comment