शरद पवार हेच महाविकासआघाडी सरकारचे खंदे आणि अनुभवी मार्गदर्शक -शिवसेना



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठबळासह महाराष्ट्रात सत्ता स्थापित करत आहे. शपथविधीच्या दिवशी शिवसेनेच्या मुखपत्राने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे तोंडभर कौतुक केले आहे. शिवसेनेने पवारांना महाविकासआघाडी सरकारचे खंदे आणि अनुभवी मार्गदर्शक म्हटले आहे. यापूर्वीही सामनातील मंगळवारच्या अग्रलेखात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्रित आणण्यात पवारांचे नेतृत्व शिवसेनेने मान्य केले होते.

राजकीय घडामोडींची 15 ऑगस्ट 1947 शी केली तुलना

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यामध्ये सत्ता स्थापित होत आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी जसा जल्लोष साजरा करण्यात आला, आज तसाच आनंद आणि उत्साह महाराष्ट्रासह देशभर दिसून येत आहे. यासोबतच या शिवसेनेने भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचाही खरपूस समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारला फडणवीस यांनी तीन चाकाचे ऑटो रिक्शा सरकार म्हटले होते. परंतु, फडणवीसांनी सत्ता टिकणार नसल्याचा शाप लागणार नाही. उलट महाविकासआघाडीचे सरकार हे राष्ट्रीय प्रश्नांवर नाही, तर राज्यातील प्रश्नांवर आणि विकासाच्या मुद्द्यावर स्थापन होत आहे. आणि राज्याच्या विकासाबद्दल कुठल्याही पक्षामध्ये मतभेद नाहीत. शेवटी महाराष्ट्र धर्म हा व्यापक आहे. त्याच महाराष्ट्र धर्मातून शिवरायांचे स्वराज्य अवतरले असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post