अमित शहा नव्हे, शरद पवारच चाणक्य


माय नगर वेब टीम
मुंबई - शरद पवार देशातील राजकारणातील एक गुढ व्यक्तीमत्व असल्याचे स्पष्ट करणारे हे दोन वक्तव्य आहेत. एका दगडात अनेक पक्षी मारण्याचे कौशल्य त्यांना चांगलेच अवगत आहे. घरात व पक्षात निर्माण झालेले हे बंड पवारांऐवजी दुसरे कोणी नेता असता तर मोडणे अशक्यच होते.

राजकारणातील नवे चाणक्य म्हणून उगवू पाहणारे अमित शाहा महाराष्ट्रातील सूत्र पडद्यामागून हलवत होते. परंतु त्यांचा समोरील खेळाडू कसलेले राजकारणी होते, हे कदाचित ते विसरले असतील. यामुळे महाराष्ट्रातील भाजप सरकार केवळ तीन दिवसांचे ठरले आणि पवारांचा पक्ष आणि घरात आलेले संकट निवळले.

तीन दिवसांपूर्वी अजित पवार रातोरात भाजपला जाऊन मिळणे हे पवारांचीच खेळी आहे की त्यांचे काकाविरुद्ध बंड हे कळणे अवघड आहे. अजित पवार यांचा बरोबर 30 ते 35 आमदार असल्याचा दावा केला जात होता. पण गेल्या तीन दिवसांत दिवसागणीक ही संख्या कमी कमीत होत शेवटी फक्त अजित पवार यांच्या पुरतीच मर्यादीत राहिली.

फुटीर असलेल्या सर्व आमदारांना त्यांनी पुन्हा आपल्या तंबूत आणले. त्यासाठी कुटुंबापासून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांना सोबत घेऊन रणनिती तयार केली.

कौटुंबिक पातळीवर किल्ला सुप्रीया सुळे, त्यांचे पती सदानंद सुळे, शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी लढवला. रोहित यांनी केलेली भावनिक साद चांगलीच चर्चेत राहिली. या तिघांच्या प्रयत्न अजित पवारांचे मन वळवण्यात महत्त्वाची भूमिका आहे. तर पक्षीय पातळीवर प्रफ्फुल पटेल, जयंत पाटील यांनी अजित पवारांचे मन वळवण्यात

यश मिळवले. इतर आमदारांना पक्षात आणण्यासाठी ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते कामाला लावले. शेवटी त्यांचा प्रयत्नांना 100 टक्के यश आले.

ज्यावेळेस राष्ट्रवादीत बंड झाले तेव्हाच शरद पवार यांनी स्पष्ट केले, की हे महाराष्ट्र आहे. मणिपूर, कर्नाटक, गोवा नाही. भाजपचे चाणक्य समजले जाणारे अमित शाहा यांना हा स्पष्ट संदेश होता.

यानंतर तरी भाजपकडून अधिक कळजीपूर्वक पावले टाकायला हवी होती. परंतु भाजप नेत्यांचा अतिआत्मविश्वासाने त्यांचा घात केला. बंडाच्या दिवशी शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतच राष्ट्रवादीतील बंड औटघटकेचे ठरणार असल्याचे जणू स्पष्टच केले होते.

केवळ राष्ट्रवादीच्या पातळीवरच नाही तर शिवसेना आणि काँग्रेसला एकत्र आणण्याचे कसबही शरद पवार यांच्यामुळेच शक्य झाले. दोन्ही पक्ष दोन विरोधी टोकाची. चुंबकाच्या ध्रुवाप्रमाणे काम करणारी. पवारांनी शिवसेनेेचे हिंदुत्व मवाळ केले तर काँग्रेसला महाआघाडीचा नफा समजून सांगितला.

यामुळे केंद्रीय काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांच्या विरोधानंतर सोनिया गांधी शिवसेनेसोबत सरकारमध्ये येण्यास तयार झाल्या. यामुळेच महाराष्ट्रात आता शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी असे नवीन समीकरण तयार होऊन सरकार सत्तेवर येत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post