भाजपने लज्जास्पद काम केले



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहेत. काँग्रेसच्या संसदीय गटाच्या बैठकीनंतर गुरुवारी त्या बोलत होत्या. महाराष्ट्रात भाजपने लोकशाहीला नुकसान पोहोचविण्याचे लज्जास्पद काम केले. शिवसेना, भाजप आणि काँग्रेसची सत्ता येऊ नये यासाठी भाजपने पुरेपूर प्रयत्न केला होता. एवढेच नव्हे, तर राज्यपाल भगत सिंह कोश्यारींनी देखील तसेच केले. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या निर्देशांचे पालन करत होते. राज्यपालांनी 23 नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांना शपथ देण्यासाठी भल्या पहाटे केलेला खटाटोप योग्य ठरवला जाऊ शकत नाही असेही सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष पुढे म्हणाल्या, "महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेने निवडणुकीपूर्वी युती केली. परंतु, निकालानंतर ती टिकू शकली नाही. त्याला भाजपचा अहंकार जबाबदार आहे. भाजपने आमच्या आघाडीला सुद्धा नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. यानंतर मोदी आणि शहांचा भांडाफोड झाला. मी खात्रीपूर्वक सांगते, की तिन्ही पक्ष एकत्र राहून भाजपचे मंसूबे फस्त करतील."

उल्लेखनीय बाब म्हणजे, राज्यपाल कोश्यारी यांनी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता भाजपचे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. त्यासाठी भल्या पहाटे 4 वाजता राष्ट्रपती राजवट हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. पहाटेच 5.17 वाजता राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली आणि भाजपचे सरकार स्थापित करण्यात आले. राज्यपालांच्या याच निर्णयाविरुद्ध शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुप्रीम कोर्टात गेले होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने 24 तासांत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आणि भाजपचे सरकार कोसळले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post