माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - महाराष्ट्र राज्यात विकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अहमदनगर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जल्लोष करण्यात आला. सिध्दार्थनगर येथे ढोल ताश्यांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करीत नागरिकांना लाडू वाटण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, उबेद शेख, बाळासाहेब भंडारी, मयूर पाटोळे, मोबीन शेख, अरुण इनामदार, मनोज सत्रे, साहिल सादिक, दिनेश पंडित, अजय मिसाळ, परवेज जकारिया, आबासाहेब गुंड, सतीश मंडलिक, गुरु भिंगारदिवे, भैय्या बॉक्सर, मनोज गुंदेचा, फारुक शेख, फैय्याज केबलवाला, निजाम जहागीरदार, नसीर शेख, मुदस्सर शेख आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment