अहमदनगर - नगर-पुणे महामार्गावरील कामरगाव येथील हॉटेल सुवर्णज्योत जवळ दुचाकी-ट्रकमध्ये झालेल्या अपघातानंतर ट्रकला लागलेल्या आगीत कागदांच्या रीळने भरलेला ट्रक जळून खाक झाला. ही घटना शुक्रवारी दि. 29 रोजी दुपारी 12 च्या सुमारास घडली.
नगर -पुणे महामर्गावर कामरगाव जवळ दुचाकी- ट्रक एम एच -१९ झेड ४३१८ चा अपघात झाला. या अपघातात मोटारसायकल ट्रकखाली गुतून घासत गेल्याने ट्रकने पेट घेतला. आग लागल्याचे ट्रक चालकाच्या लक्षात येताच त्याने ट्रक थांबविली. कामरगाव ग्रामस्थांनी अग्निशमन विभागाला ट्रक पेटल्याची माहिती दिली. तसेच पोलिसांनाही माहिती दिली. ट्रकमध्ये कागदाचे मोठे रीळ असल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली. आगीत ट्रक पूर्ण जळून खाक झाली. या घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नाही. दरम्यान, अग्निशमनची गाडी घटनास्थळी दाखल झाली व त्या गाडीने पेटती ट्रक विझवली. या घटनेमुळे सुमारे दीड तास वाहतूक ठप्प झाली होती. ट्रक विझविल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळित केली.
Post a Comment