शशांक खेतानच्या चित्रपटात पुन्हा एकदा काम करणार वरुण धवन, भूमी-किआरा असतील हिरोईन




माय अहमदनगर वेब टीम
बॉलिवूड डेस्क - शशांक खेतान दिग्दर्शित 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया'मध्ये काम केल्यानंतर वरुण धवन पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करणार आहे. पण वरुणचा शशांकसोबतचा तिसरा चित्रपट हा 'दुल्हनिया' फ्रँचायझीचा चित्रपट नाही. सूत्रानुसार, हा व्यावसायिक करमणूक चित्रपट असेल.

भूमी पेडणेकर आणि किआरा आडवाणींची नावं निश्चित
सूत्रानुसार, वरुणसह दोन नायिका यात घेण्यात येणार आहेत. या चित्रपटासाठी भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी यांना फायनल करण्यात आले आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या चित्रपटाचे शीर्षक अद्याप जाहीर झालेले नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post