माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - साडेनऊ लाखांचे सोयाबीन धुळे येथे पोहोच करण्यास पाठविले असता वाहनचालकाने सदर सोयाबीनचा अपहार करुन व्यापाऱ्याला गंडा घातला. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात वाहनचालक मुकेश कुमार (रा. सैंदवा, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, मार्केट यार्डमधील व्यापारी भगवानदास मुळचंद गुगळे (रा. कानडे मळा, सारसनगर, नगर) यांनी धुळे येथे पोहोच करण्यासाठी एका ट्रकमध्ये 9 लाख 51 हजार रुपयांचा माल भरून दिला होता. ती ट्रक धुळे येथे पोहोच करण्यास सांगितली होती. चालक सदर ट्रक नगरमधून घेऊन गेला. मात्र धुळे येथे पोहोच करण्याऐवजी त्याने त्यातील सोयाबीनची परस्पर विल्हेवाट लावली.
फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात येताच व्यापारी भगवानदास गुगळे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मुकेश कुमार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ हे करीत आहेत.
Post a Comment