आज जे लोक साठीच्या आसपास आहेत त्यांच्या लहान वयात लोकांच्या घराघरात टीव्ही नव्हते त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जागून काही पहावे असे काही घरात नव्हतेच. म्हणून आपण लहानपणी आठ ते साडे आठ या दरम्यान झोपत होतो आणि दुसरे दिवशी सकाळी सहाच्या सुमारास उठत होतो. पण आता तसे काही राहिलेले नाही. मुले रात्रीपर्यंत जागत आहेत. कारण टीव्हीवर रात्री १० ते १०.३० पर्यंत कार्यक्रम असतात. आता मुलांच्या झोपेची वेळ रात्री अकरा अशी झाली आहे. रात्री साडे आठ वाजता झोपणे हे आता अशक्य होऊन बसले आहे. एकदा अशा झोपण्याच्या वेळा बदलल्या की जेवणाच्याही वेळा बदलतात आणि त्याचा परिणाम मुलांच्या पचनशक्तीवरही होतो. म्हणूनच रात्री उशिरा झोपणे आणि उशिरा जेवणे यांचा संबंध जाडीवर होतो.
जी मुले रात्री उशिरापर्यंत जागतात त्यांचे वजन जास्त असतेे. जी मुले लवकर झोपतात आणि लवकर उठतात त्यांचे वजन तुलनेने कमी असते. या प्रयोगात असे आढळले आहे की रात्री उशिरा झोपणारी मुले सकाळी उशिरापर्यंत झोपू शकत नाहीत. मुलांना किमान आठ ते नऊ तास झोप हवी असते. पण ती रात्री अकरा वाजेपर्यंत जागली तरी सकाळी आठ पर्यंत झोपू शकतीलच असे नाही. सकाळची शाळा असल्यावर तर त्यांना सहा वाजताच उठावे लागते. म्हणजे फार तर सात तास झोप होते. एवढी झोप पुरत नाही आणि ही मुले पेंगतच शाळेला जातात. अंगात उत्साह नसतो. तो निर्माण करण्यासाठी अशी मुले खात राहतात आणि त्याचाही परिणाम लठ्ठपणा वाढण्यात होत असतो.
Post a Comment