निरोगी आरोग्यासाठी 3 ते 8 डिसेंबर दरम्यान योग चिकित्सा व प्राणायम शिबीर


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर- योगगुरु प.पू. रामदेव बाबांनी योगासने व ध्यानधारणा क्षेत्रात संपूर्ण जगात सर्वात मोठे कार्य उभे केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतात योगासणे, प्राणायम व ध्यानधारणेची शिबीरे होत आहेत. नगरमधील सर्वसामान्य कुटूंबांतील मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब सारख्या व्याध्यांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना तात्काळ व्याधीमुक्ती मिळावी यासाठी तसेच अशा असाध्य व्याध्या निरोगी नागरिकांना जडू नयेत, यासाठी संत नागेबाबा मल्टीस्टेट परिवाराच्यावतीने पुढाकार घेऊन सामाजिक जाणीवेतून राबण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत पतंजली योग समितीच्या सहकार्याने नगरमध्ये 6 दिवस नि:शुल्क योगचिकित्सा, प्राणायम व ध्यानधारणा शिबीराचे आयोजन केले आहे. मंगळवार दि.3 ते 8 डिसेंबर 2019 दरम्यान सकाळी 5 ते 7.30 या वेळेत झोपडी कॅन्टीनजवळील बिशप लॉयडस् कॉलनी, सावेडी येथे प्रती रामदेवबाबा म्हणून ओळखले जाणारे योगगुरु स्वामी आनंददेवजी महाराज हे सर्वांना योगासने, ध्यानधारणेचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्याबरोबरच महत्व समजून देणार आहेत. त्याचबरोबर दरोज सायंकाळी 5 ते 6.30 या वेळेत शिबीरस्थळी श्रीमद् भगवत गीताचे प्रवचनही होणार आहे. अशी योग व अध्यात्माची सांगड असलेले हे शिबीर असणार आहे, अशी माहिती संत नागेबाबा मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन कडूभाऊ काळे यांनी दिली.


नि:शुल्क होणार्‍या या योग शिबीराबद्दल अधिक माहिती देतांना पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी प्रा.बाळासाहेब निमसे म्हणाले, या नि:शुल्क शिबीरामध्ये योग प्रशिक्षण व ध्यानधारणेबरोबरच शिबीराला येणार्‍या सर्व नागरिकांना घरगुती जडीबुटी उपचारांची माहिती देऊन मोफत जटीबुटी वनस्पतींचे वितरण करण्यात येणार आहे. शिबीरस्थळी आयुर्वेद तज्ञांचे उपचारांवर मोफत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच नि:शुल्क आयुर्वेद प्राकृतिक, अ‍ॅक्युप्रेशर, आहार चिकित्सांबद्दल माहिती देण्यात येणार आहे. तसेच मोफत सर्वरोग निदान शिबीर या ठिकाणी होणार आहे. विश्‍वशांतीसाठी या ठिकाणी सामुहिक यज्ञ व होम हवन होणार आहे. यात सर्व भाविक सहभागी होऊ शकतात.

जिल्हा संघटक मधुकर निकम यांनी सांगितले की, सहा दिवस चालणार्‍या या शिबीरात संगणकामध्ये उच्च विद्या विभुषित असलेले आनंददेवजी महाराज हे योगगुरु प.पू.रामदेव बाबा यांनी हरिद्वार येथील आश्रमात गेल्या 10 वर्षांपासून योग, प्राणायम, आयुर्वेद, वेद उपनिषधे यांचा गाढा अभ्यास केला असून, पारंगत झाले आहेत. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत आनंददेव महाराज सहभागी झाले होते. एवढ्या कमी वयात त्यांनी केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. अशा महान योगगुरु कडून नगरच्या नागरिकांना योग चिकित्सा व ध्यानधारणेचे धडे मिळणार आहेत. या शिबीरानिमित्त शिबीरस्थळी सायंकाळी 5 ते 7.30 या वेळेत स्वामी आनंददेव महाराज श्रीमद् भगवत गितेचे प्रवचनही करणार आहेत.

सध्याच्या धावपळीच्या दिनचर्यत लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच अनेक असाध्य आजार जडत आहेत. दिवसेंदिवस या आजारांमध्ये वाढ होत आहे. हॉस्पिटलांमधून मिळणारे उपचारांमुळे व्याधी दूर होतीलच याची खात्री नाहीयं. अशा परिस्थितीत जर रुग्णांनी हॉस्पिटलमधील उपचारांबरोबरच भारताची वैभवशाली पुरातन परंपरा असलेले योगासने व ध्यानधारणा केल्यास मानसिक स्वास्थ्य प्रबल होऊन अनेक व्याधी दूर होऊ शकतात हे सिद्ध झाले आहे. तरी नगर शहरासह जिल्ह्यातून नागरिकांनी या नि:शुल्क शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पतंजली योग समितीचे कोषाध्यक्ष अविनाश ठोकळ व संत नागेबाबा परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे. सहा दिवस चालणार्‍या या शिबीराचे वैदीक टीव्ही चॅनलवर थेट प्रसारण दररोज होणार आहे.

यावेळी स्वामी आचार्य राहुल ठोकळ, पतंजली समितीचे युवाध्यक्ष पवन परीक, ज्योत्सना महाजन रुपाली काळे, ज्योती शेटे आदि उपस्थित होते. संजय मानवेलिकर यांनी आभार मानले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post