मुलांनी खजूर खाण्याचे 4 फायदे
माय अहमदनगर वेेेब टीम
हेल्थ डेस्क - लहान मुलांसाठी खजूर पौष्टिक आहार आहे. यामुळे शरीराला ताकद मिळते आणि मुलांचा लवकर विकास होतो. ज्या मुलांना जास्त शुगर क्रेव्हिंग त्यांच्यासाठीही खजूर उत्तम पर्याय ठरू शकतो.
मुलांना मिळेल ऊर्जा
खजुरात व्हिटॅमिन ए, बी १, बी२, बी ३,बी ५ आणि विटॅमिन सी असते. मुलांना खजूर खाल्ल्याने ऊर्जा मिळते. तसेच खेळ किंवा अभ्यासात जास्त ऊर्जावान असल्याची अनुभूती येते. ज्या मुलांना लवकर थकवा येतो किंवा जी कमकुवत आहेत, त्यांनादेखील खजूर खाल्ल्यानंतर काही दिवसांतच फायदा व्हायला लागतो.
मज्जासंस्थेला बळकटी
खजुरामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. सोबतच यामध्ये सोडियमदेखील आढळते. ही दोन्ही पोषक द्रव्ये मज्जासंस्था योग्य पद्धतीने काम करण्यात मदत करतात. यामुळे मुलांच्या मेंदूचा विकास होतो आणि ते अभ्यासावर उत्तम पद्धतीने लक्ष केंद्रित करू शकतात.
पचनक्रिया चांगली राहते
लहान मुलांना नेहमीच पोट फुगण्याचा किंवा अपचनाची समस्या होते. खजूर खाल्ल्यास त्या दूर होतील. वस्तुत: खजुरातील फायबरमुळे पचनक्रिया चांगली राहते. २-३ खजूर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे त्यांची पचनक्रिया चांगली राहते आणि त्यांना पोषणदेेखील मिळते.
रक्त वाढण्यास मदत
अॅनिमिया झाल्यास डॉक्टर खजूर खाण्याचा सल्ला देतात. याने शरीराला पुरेसे लोह मिळते. ज्या मुलांना अॅनिमिया आहे त्यांच्यासाठी खजूर फायद्याचे आहेत. तुमच्या मुलाच्या छातीत दुखत असेल खजूराने फायदा होईल.
खजूरपासून बनवू शकता हेल्दी डिश
खजुराची बर्फी
खजुरातील बिया काढून टाका. ते मिक्सरमधून बारीक करा. सुका मेवा आणि खसखस थोडी भाजून घ्या. एका भांड्यात तूप टाका. तूप गरम झाल्यानंतर त्यात वेलची पावडर व खजुराचे मिश्रण टाका. हे थोडा वेळ मध्यम आचेवर शिजवा. आता यामध्ये सुका मेवा व खोबरे टाका. हे थोडे ड्राय होईपर्यंत चमच्याने हलवत राहा. एका प्लेटमध्ये तूप टाकून हे मिश्रण त्यामध्ये टाका. दोन-तीन तासानंतर याचे मनपसंद आकारात कापून घ्या. खसखस व सुका मेवा टाकून सर्व्ह करा.
खजूर मिल्कशेक
सर्वप्रथम खजुराच्या बिया काढून छोटे टुकडे कापून घ्या. ते ब्लेंडरमध्ये दूध टाकून वाटून घ्या. आता उर्वरित दूध, साखर आणि वेलची पावडर वाटून घ्या. यात आइस क्यूब टाकून चांगले फेटा. ग्लासात काढा आणि बर्फ टाकून खजूर मिल्कशेक सर्व्ह करा. हिवाळ्यात यात न टाकता सेवन करा.
Post a Comment