अमेरिकेत विमान कोसळून ९ जण ठार




माय अहमदनगर वेब टीम
वॉशिंग्टन - अमेरिकेतील दक्षिण डकोटा येथे विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वैमानिक आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत तीन प्रवाशी जखमी झाले आहेत, असे वृत्त अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानातून १२ लोक प्रवास करीत होते. या विमानाने चेम्बरलेन येथून उड्डाण घेतले होते. त्यानंतर काही वेळातच हे विमान दक्षिण डकोटा येथे कोसळले. यात ९ जणांचा मृत्यू झाला. तर तिघे प्रवाशी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सिओक्स फॉल्स येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही दुर्घटना नेमकी कशामुळे झाली याचा तपास राष्ट्रीय परिवहन सुरक्षा बोर्ड करत आहे. याबाबत राष्ट्रीय परिवहन सुरक्षा बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या महितीनुसार, मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.

दरम्यान, दक्षिण डकोटा येथे बर्फवृष्टी होत असल्याने दृश्यमानता कमी झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post