माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : नगरचे राजकारण म्हणावे एवढे सोपे नाही. त्यामुळेच म्हणतात अहमदनगर हे काना, मात्रा, वेलांटी, उकार नसलेलं शहर आहे. आणि मी ते जवळून पाहिले आहे. असे मत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीसाठी सकाळी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, जिल्हाप्रमुख राजेंद्र फाळके, माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, करण ससाणे, क्रांतिकारी पक्षाचे सुनील गडाख, कैलास वाकचौरे, आशुतोष काळे, बाळासाहेब सोळंके, माजी.आ.चंद्रशेखर घुले, प्रताप ढाकणे आदी उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले की, जिल्हा परिषद सदस्य व माझे जुने नाते आहे. माझ्या राजकारणाची सुरूवात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झाली आहे. नगरचे राजकारण सोपे नाही हे मी जवळून पाहिले आहे. पण मला येथील लोकांनी समजून घेतले. त्यामुळे आगामी काळामध्ये मागे काय झाले याच्या फंदात पडायचे नाही आगामी काळामध्ये आपल्याला कशा पद्धतीने पुढे जायचे व विकास कामे करायचे यासाठी नियोजन करा,' असा सल्लाही त्यांनी दिला.
कोळसा कितीही उगाळला तरी...
राष्ट्रवादीचे पक्षनिरीक्षक अंकुश काकडे म्हणाले की, राज्यात नवीन राजकीय पर्व सुरू झाले आहे.ते आता जिल्ह्यात देखील राबवायचे आहे.कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच, त्यामुळे जुन्या आठवणी काढायच्या नाहीत.आता केवळ वरिष्ठांच्या निर्णयाची अंमलबजावणी करायची.
Post a Comment