अहमदनगरच्या चार अश्वांनी गाजवली ऑल इंडिया चेतक फेस्टिव्हल स्पर्धा
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- नंदूरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे ऑल इंडिया चेतक फेस्टिव्हलच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धेत नगरच्या अर्बड, फर्जंद, बुलंद, काझिम या चार अश्वांनी चमकदार कामगिरी करत नगरचा झेंडा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत फडकावला. नगरमधील अश्वप्रेमी आमदार अरुण जगताप, राज सातपुते, इम्रान शेख, अजिज अनिदीन यांच्या मालकीचे हे अश्व आहेत.
सारंगखेडा येथील ही स्पर्धा गेल्या साडेतीनशे वर्षांपासून सुरू आहे. या स्पर्धेसाठी देशभरातील विविध प्रजातींचे अश्व सहभागी होत असतात. यावर्षी ऑल इंडिया चेतक फेस्टिव्हलने आयोजित केलेल्या स्पर्धेत महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा, तामिळनाडू या राज्यांमधून सुमारे 3 हजार अश्व सहभागी झाले होते.
स्पर्धेत गुण मिळविण्यासाठी अश्वांचा देखणेपणा, रुबाब, उंची, डोळे, कान, पाय, मान, दात तसेच इतर अवयवांचा डौलदारपणा त्यांची राखली जाणारी निगा याचे परिक्षण केले जाते.
या स्पर्धेत नगरमधील आमदार अरुण जगताप यांच्या अर्बड नावाच्या अश्वाने स्टायलींग रिंगमध्ये सेकंड रन-अपचा मान मिळवला. राज सातपुते यांच्या फर्जंद नावाच्या अश्वाने प्रथम रन-अप मिळविला. सातपुते यांच्या ऑस्कर नावाच्या अश्वाने सन 2016-17 मध्ये ऑल इंडियामध्ये 7 किताब मिळविले होते. त्याचबरोबर बेस्ट ऍनिमलचा किताब पटकावला होता. 2018-19 मध्ये त्यांच्या अलबक्ष नावाच्या अश्वाने ऑल इंडिया स्पर्धेमध्ये आठ पारितोषिके मिळविली होती.
इम्रान शेख यांच्या बुलंद नावाच्या अश्वाने दोन दात श्रेणीमध्ये सेकंड रन-अप मिळविला. अजिज अनिदीन यांच्या काजिम नावाच्या अश्वाने सेकंड रन-अपचा मान मिळविला आहे.
Post a Comment