माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर तालुक्यातील अंबिलवाडी शिवारात नगर सोलापूर रोडवर राज्य परिवहनची अक्कलकोट ते मालेगाव व झायलो गाडी यांच्यांत भीषण अपघात होऊन तीन जण जागीच ठार तर सहा जखमी झाले. ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. अपघातात ठार झालेले तीनही नगरचे आहेत.
नगर -सोलापुर महामार्गावर आंबिल वाडी शिवारात शनिवार दि .२८ रोजी दुपारी दोन सुमारास अक्कलकोट - मालेगाव एस .टी. बस (एम.एच १४ टी ३३३७) भरधाव वेगाने नगरकडे येत होती तर समोरून झायलो गाडी (एम.एच.१६ ए. टी ४४७७) पंढरपूरला जात होती. या दोन्ही गाडयांचा झालेल्या भीषण अपघातात झायलो गाडीतील अरुण बाबुराव फुलसौंदर(वय-५५), अर्जुन योगेश भगत(वय-१२), ताराबाई शंकर भगत (वय-६०) सर्व राहणार नगर जागीच ठार झाले. तर अक्कलकोट-मालेगाव या गाडीतील सहा प्रवाशी जखमी झाले आहेत.
अपघात इतका भयानक होती की अपघात पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीतील लोकांचे मृतांची अवस्था पाहून बघ्यांचे डोळे पाणावले, अपघात ज्या ठिकाणी झाला ते ठिकाण अतिशय धोकादायक आहे. या ठिकाणी वारंवार अपघात होतात. नगर सोलापूर रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यांची अवस्था गंभीर बनली असल्याने अपघातांची संख्या वाढतच चालली आहे. किती जणांचा बळी घेतल्यानंतर या रस्त्याची सरकार दखल कधी घेणार ?असा प्रश्न नागरिक करत आहेत.
नगर सोलापूर रस्त्याची चौपदरीकरण सरकारने येणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात केले नाही तर जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या दालनात ठिय्या मांडून रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा या भागातील जनतेच्या वतीने देण्यात आला आहे.
रवींद्र भापकर, पंचायत समिती सदस्य, नगर तालुका.
Post a Comment