एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला ; एक आरोपी सापडला


माय अहमदनगर वेब टीम

राहुरी– राहुरी शहरातील बसस्थानकासमोरील भरपेठेतठ असलेले एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच अज्ञात पाच चोरट्यांनी तेथून अंधाराचा फायदा घेत पलायन केले. मात्र, पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून एकाजणाच्या मल्हारवाडी शिवारात मुसक्या आवळल्या. तर उर्वरित पसार झाले.

ही घटना रविवारी (दि.08) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. हे एटीएम अगदी भरपेठेत आहे. रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमजवळ अंधारात काहीतरी वाजत असल्याची चाहूल गस्तीवर असलेल्या पोलिसांना लागली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच त्यांना पाहताच चोरटे पळून गेले. तर पोलिसांनी त्यांचा मल्हारवाडी शिवारात एक किमी पाठलाग करून त्यातील एकाजणाच्या मुसक्या आवळल्या. पकडण्यात आलेला आरोपी राहुरी तालुक्यातील असून दत्तात्रय बोर्‍हाडे असल्याची माहिती राहुरी पोलिसांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post