शिवम् ग्लोबल स्कुलमधील वेशभूषा स्पर्धेत चिमुरड्यांनी जिंकली मने
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीची जोपासना करत वेगवेगळ्या वेशभूषा करत रॅम्पवर अवतरलेल्या बाल तारे-तारकांनी उपस्थितांची मने जिंकली. निमित्त होते केडगावच्या लोंढे मळा येथील शिवम् ग्लोबल स्कुलमध्ये आयोजित केलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे. या स्पर्धेस पालक वर्गांचा मोठा प्रतिसाद लाभला.
या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत विविध प्रकारची फळे, फुले, प्राणी, वृक्ष यांच्याशिवाय वारकरी, छोटा भीम, पायलट, क्रिश, फुलपाखरू, मोर तसेच महाराष्ट्रीयन, पंजाबी, काश्मिरी, राजस्थानी आदी राज्यांतील वेशभूषांचे सादरीकरण चिमुरड्यांनी केले. विशेषत: भाताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू ते विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेशभूषेत व्यासपीठावर आलेल्या विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या घेतल्या. झाशीची राणी, सावित्रीबाई फुले यांच्यासह अन्य समाज सुधारक व थोर महापुरुषांच्या वेशभूषाही सादर करण्यात आल्या. 'जय जवान जय किसान'चा नारा देत प्लॅस्टिकचा वापर टाळण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहणे म्हणून समृद्धी पोळ यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष संतोष लोंढे, संचालक सौरभ लोंढे, शुभम लोंढे, श्रेया लोंढे, प्राचार्य नंदकुमार शेजूळ, आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी शाळेतील शिक्षिका मयुरी कुलकर्णी, वर्षा मंदिलकर, पूजा दळवी, निलीमा डाके, अश्विनी हारदे, राजश्री यादवाडकर, संगीता देशमुख, अमर जगताप, उषा कोतकर, आदींनी परिश्रम घेतले.
या स्पर्धेत नर्सरी प्ले-ग्रुप मधील कृष्णा सोनवणे, स्वानंदी काळे, स्वराज सातपुते, एल.के.जी. मधील ज्युवेरीया शेख, प्रांजल येवले, महेक शेख, यु.के.जी. मधील गार्गी जाधव, गौरी दळवी, इशान _ पालवे, सेमी ए मधील पुर्वा जोशी, वेदिका वाकचौरे, श्रावणी जाधव, सेमी बी मधील सर्वेश विधाते, वेदांत दारकुंडे, रुद्रा कोतकर, सिराज शेख, वैष्णवी काळापहाड, आदींनी पारितोषिके पटकावली.
Post a Comment