'त्या' फेसबुक पोस्टबद्द्ल पंकजा मुंडे बोलल्या...
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या एका फेसबुक पोस्टवरुन त्या पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू झाल्या होत्या. पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याचे सांगितले जात होते. भाजपचे नेते राम शिंदे आणि विनोद तावडे यांनी देखील आज पंकजा मुंडे यांची भेट घेतली. त्यामुळे पंकजा मुंडे आपल्या पुढील वाटचालीबद्दल नेमकी काय घोषणा करणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. आता या संपूर्ण विषयावर स्वत: पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
"माझ्या फेसबुक पोस्टचा विपर्यास केला गेला. मी पक्ष सोडणार या निव्वळ अफवा आहेत. पद मिळवण्यासाठी मी दबाट टाकतेय हा आरोपही चुकीचा आहे. मी 12 डिसेंबरला बोलेल असे सांगितले होते. मला आत्मचिंतनासाठी आणि वेळ हवा आहे. तो वेळ मला दिला पाहिजे. ती पोस्ट आत्ता केली आणि आत्ताच त्यावर बोलणे, भाष्य करणे मला शक्य नाही. पण इतकंच सांगते की मी दरवर्षी गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम घेते. माझ्या पोस्टवर सुरुवातीला सर्वच चॅनलने व्यवस्थित बातमी दिली. मात्र, एक दोन वर्तमानपत्रांनी पंकजा मुंडे पक्ष सोडणार अशी बातमी केली. यानंतर या सर्व चर्चेला वेगळा सूर आला आणि वेगळ्या पद्धतीने हाताळणी सुरु आहे. त्यामुळे मी खरंच खूप दुःखी आणि व्यथित आहे." असे पंकजा म्हणाल्या.
Post a Comment