माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळ्यातील आरोपी माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने बुधवारी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सशर्त जामीन मंजूर केला. चिदंबरम कोणत्याही प्रकारे साक्षीदारांवर दबाव टाकणार नाहीत आणि पुराव्यांशी छेडछाड करणार नाहीत. तसेच ते याबाबत माध्यमांशी कुठल्याही प्रकारचा संवाद साधू शकणार नाहीत. असे न्यायालयाने सांगितले. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मागणीनंतर दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांनी जामीन देण्यास नकार दिला होता. 28 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती आर भानुमती यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील निकाल राखून ठेवला होता.
पी. चिदंबरम भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंगप्रकरणात 106 दिवसांपासून तुरुंगात आहेत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर जवळपास 2 महिन्यांनंतर त्यांना जामीन मिळाला होता. मात्र यानंतर ईडीने तत्काळ त्यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती.
Post a Comment