विकासकामांना स्थगिती नव्हे गती देण्याकडे लक्ष - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यापासून उद्धव ठाकरे एकापाठोपाठ एक निर्णय घेत आहेत. पहिल्याच दिवशी आरे कारशेडला स्थगिती देण्यासारखा मोठा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर विकासकामांसाठी श्वेतपत्रिका काढणार असल्याची घोषणा त्यांनी केली. त्यानंतर आज त्यांनी आधावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी कोणत्याही विकास कामांना स्थगिती देण्यात आलेली नाही, केवळ त्यात ही कामं उलट अधिक गतीने कशी होतील याकडे आम्ही लक्ष देत आहोत, असे सांगितले.
माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "रोज आमच्या आढावा बैठका सुरू आहेत. मला जी माहिती हवी आहे ती माहिती मी घेतो आहे. याचप्रमाणे आज जी आढावा बैठक झाली, त्यात कोणत्याही विकास कामांना स्थगिती देण्यात आली नाही. केवळ त्यात ही कामे अधिक वेगाने कशी होतील याकडे लक्ष देत आहोत," असे त्यांनी सांगितले. तसेच, राज्यातील सध्या सुरू असलेल्या आणि बंद असलेल्या कामांचा आज मुख्यमंत्र्यांनी बैठकीद्वारे आढावा घेतला.
Post a Comment