पतीच्या खून प्रकरणी पत्नीस जन्मठेपेची शिक्षा
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – पतीचा गळा दाबुन खुन केल्या प्रकरणी कमल उर्फ उषा भाऊसाहेब शिंदे (वय 35, रा. अंबिकानगर, राहुरी फॅक्टरी) हिला जिल्हा न्यायाधिश क्र. 2 अशोककुमार भिल्लारे यांनी जन्मठेप व पाच हजार रूपये दंड व दंड न भरल्यास सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.
या खटल्याची माहिती अशी की, कमल उर्फ उषा भाऊसाहेब शिंदे (वय 35, राहुरी फॅक्टरी) हिचे योगेश उर्फ पप्पू सुधीर चोथे याचेशी अनैतिक संबंध होते. या संबंधास कमल हिचा पती भाऊसाहेब भिकाजी शिंदे याचा अडसर होत असल्याने योगेश चोथे व कमल शिंदे यांनी भाऊसाहेब शिंदे यांचा गळा दाबुन खुन केला. याप्रकरणी बाळू शिंदे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. हि घटना 5 मे 2017 मध्ये घडली.
या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधिश क्र.2 यांच्यासमोर झाली. सरकार पक्षाच्यावतीने एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले. तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले, वैद्यकीय अधिकारी सुधीर क्षीरसागर यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी पक्षाने सादर केलेला पुरावा व युक्तीवाद ग्राह्य धरून कमल शिंदे हिस जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. आरोपी योगेश चोथे याची पुराव्या अभावी निर्दोष सुटका केली.
सरकार पक्षाच्यावतीने अॅड. सतिश पाटील व सहाय्यक सरकारी वकील अनिल घोडके यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी हे.कॉ. एम. ए. थोरात यांनी सहाय्य केले.
Post a Comment