शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी प्रयत्नशील -आ.संग्राम जगताप


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - समता, स्वातंत्र्यता, समता व बंधुत्वाची मुल्य रुजविणारी घटना डॉ.बाबासाहेबांच्या अथक प्रयत्नाने देशात आली. या महामानवाने देशाला एक विचार व दिशा दिली. हे विचार आजच्या युवा पिढीने आत्मसात करण्याची गरज आहे. त्यांच्या कार्याची व विचाराची प्रेरणा मिळण्यासाठी शहरात त्यांचा पुर्णाकृती पुतळा उभा राहण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
घटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड येथील त्यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार जगताप बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, उबेद शेख, परिमल निकम, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, अजय दिघे, चर्मकार समाजाचे संजय खामकर, माजी नगरसेवक अजय साळवे, मोहन गाडे, सुरेश आडसुळ, किसनराव भिंगारदिवे, अशोक भोसले, लहू कराळे, अमोल कांडेकर, प्रा. जयंत गायकवाड आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


आमदार जगताप पुढे म्हणाले की, डॉ.बाबासाहेबांचा पुर्णाकृती पुतळा एका परिसरा पुरता मर्यादित न राहता या पुतळ्यानेच शहराची ओळख निर्माण झाली पाहिजे. शहरात प्रवेश होतानाच नगर-पुणे महामार्गावरील पशु-वैद्यकिय रुग्णालया जवळील जागेत पुतळा उभारणीसाठी मागणी करण्यात आलेली आहे. येथे भव्य पुर्णाकृती पुतळा उभारुन त्याभोवती उद्यान विकसीत करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. तर ही जागा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रा.माणिक विधाते यांनी दीन, दलित व दुर्बल घटकातील लोकांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केले. वंचितांसाठी कार्य करण्याची भावना प्रत्येकाने मनात ठेवल्यास हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरणार असल्याचे सांगितले. उबेद शेख यांनी देखील मुस्लिम समाजाच्या वतीने डॉ.बाबासाहेबांना अभिवादन केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post