गुरूकुल शिक्षक साहित्य संमेलनात शीघ्र कवींचा अपप्रवृत्तींवर प्रहार
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- “खरतर स्त्रीनेच स्वतः स्वतःचे कृष्ण बनाचं... वेळप्रसंगी या नराधमांना जागीच चिरडाचं..”, अशा आव्हानात्मक कवितांच्या सादरीकरणाने गुरूकुल प्रतिभाविष्कार शिक्षक साहित्य संमेलनातील शिक्षक कवीसंमेलन चांगलेच रंगले. अहमदनगर जिल्हा गुरूकुल शिक्षक मंडळ, प्राथमिक शिक्षक समिती गुरूकुल सांस्कृतिक समिती, गुरुकुल महिला आघाडी, ऊर्दू शिक्षक, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक समितीच्यावतीने आयोजित कवीसंमेलनाने आणि शिक्षकालांच्या कलामहोत्सवाने उपस्थितांची मने जिंकली.
राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते गुरूकुल प्रतिभाविष्कार शिक्षक साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. ज्येष्ठ साहित्यिक तथा आमदार लहू कानडे, भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके, राज्य सरकारच्या आदर्श गाव प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, पुणे विभागाचे उपसंचालक दिनकर टेमकर, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी अरुण धामणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. साहित्यिक तथा शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर, शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष रा. या. औटी हे या कार्यक्रमाचे निमंत्रक होते.
शिक्षकांच्या कलामहोत्सवाने सुरूवात झालेल्या या शिक्षक साहित्य संमेलनाची रंगत कार्यक्रम जसा पुढे सरकत होता, तशी वाढत होती. ही रंगत कवीसंमेलनाच्यावेळी उच्चपातळीवर पोचली. कवीसंमेलनात कविता सादर करण्यासाठी 45 कवी शिक्षक सहभागी झाले. यात शीघ्र कवींनी सभागृहात हशा पिकवला, तर महिला कवी शिक्षकांनी समाजातील अपप्रवृत्तीवर शब्दांचा हल्ला चढविला. राहुरी येथील शिक्षिका जयश्री झरेकर यांच्या “खरतर स्त्रीनेच स्वतः स्वतःचं कृष्ण बनाचं, वेळप्रसंगी या नराधमांनाच जागी चिरडाचं... होईल ते होईल आता बळी नाही जायचं, आता मेणबत्ती नाही, तर या नराधमांनाच पेटवायचं...” या कविताने सभागृहातील उपस्थितांना आव्हानच दिले. शिक्षकांनी या कविताला टाळ्यांच्या कडकडाने दाद दिली. या कवीसंमेलनाचा जोर शेवटपर्यंत कायम राहिला. सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, समाजभानावर टिपण्या करणार्या या कवितांना सभागृहाने टाळ्यांच्या कडकडात दाद दिली.
जिल्हाध्यक्ष सुदर्शन शिंदे, नितीन काकडे, वृषाली कडलग, संजय धामणे, संतोष भोपे, गजानन जाधव, राजेंद्र ठागणे, इमान सय्यद, मधुकर मैड, वृषाली घोडके, नितीन भिंगारदिवे, राहुल पालवे, संतोष भांबरे, नितीन पवार, दीपक महाले, सुप्रिया घोडके, जयश्री पोतदार, स्नेहल लवांडे, रघुनाथ लबडे, विजय काकडे, सीताराम सावंत, सुखदेव मोहिते, शिवाजी रायकर, वृषाली कडलग, सुनीता काटकर, शुभांगी ईश्वरे, राजेंद्र पटेकर, रज्जाक शेख, ज्ञानेश्वर नागरे, लक्ष्मण टिमकरे, बाळासाहेब अनपट, शंकर गुंजाळ, गजानन जाधव, सुनील नरसाळे, सुभाष बर्वे, इमाम सय्यद, अश्पाक शेख, उस्मान तांबोळी, जालिंदर खाकाळ, अशोक मुठे, विठ्ठल वराळे, सचिन वांढेकर, बापू लहामटे, विजय महामुनी, आजीनाथ पांढरे, सलीम शेख, दशरथ देशमुख, सुनील गाडेकर, बाळासाहेब खेडकर, मिलिंद पोटे, संतोष भोपे, स्वाती गोरे, मीना साबळे, राजलक्ष्मी शर्मा, ज्योती शिरोळे, जया कुलथे, नर्गीस शेख, वैशाली शिंदे आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
कविता सादरीकरण केलेले शिक्षक
निती सूर्यवंशी, किसन आटोळे, सोमनाथ मंडाळकर, अनुराधा फुंदे, संपदा सुसे, श्रीकांत बिडवे, प्रतिभा बोबे, मंजुषा शिंदे, बाळासाहेब कोतकर, देवीदास दुसाने, सुनील जाजगे, मनीषा पटेकर, दत्तात्रय जाधव, जया कुलथे, अंजली महामरे, क्रांती करजगीकर, सुप्रिया इंगळे, शरद धलपे, सारिका भिंगारदिवे या शिक्षकांनी कवितांने सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
Post a Comment