इजिप्तमध्ये अपघातात भारतीय पर्यटकांसह ६ ठार, २४ जण जखमी


माय अहमदनगर वेब टीम
काहिरा : इजिप्त (मिस्र) मध्ये एका रस्ते अपघातात भारतीय पर्यटकांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर २४ जण जखमी झाले आहेत. पर्यटकांना घेवून जात असलेल्या बसची ट्रकला जोराची धडक बसल्याने हा अपघात झाल्याची माहिती एका सुरक्षा अधिकाऱ्याने एएफपीली दिली आहे. या अपघातात दोन मलेशियन महिला पर्यटक, एक भारतीय पर्यटक आणि इजिप्तचे तीन नागरिक (बस चालक, टूर गाईड आणि सुरक्षा रक्षक) यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य २४ प्रवाशी जखमी झाले आहेत. या २४ पैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. इजिप्तमधील कायरो जवळील भारतीय दूतावासकडून ही माहिती दिली आहे. सोखना जवळ १६ भारतीय पर्यटकांच्या भरलेल्या बसला हा अपघात झाला. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून २४ जण जखमी झाले आहेत. २४ जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. या अपघातानंतर भारतीय दूतावासाकडून दुजोरा देण्यात आला आहे. यासंदर्भातील दोन नंबर भारतीय दूतावासाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहेत. भारतीय दूतावासने परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना ट्विटरवर टॅग करून एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये म्हटलंय की, इजिप्तच्या ऐन सोखना मध्ये आज १६ भारतीय प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका बसला दुर्दैवी अपघात झाला आहे. या अपघातात एका भारतीय पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर भारतीय दूतावासाकडून हेल्पलाइन नंबर्स +२०-१२११२९९९०५ आणि +२०-१२८३४८७७७९ हे दोन जारी करण्यात आले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post