बोलेरो - स्कार्पिओच्या भीषण अपघातात सात जण जखमी ; दोघे गंभीर


माय अहमदनगर वेब टीम

जामखेड - जामखेड -खर्डा रोडवरील आनंदवाडी शिवारात स्कर्पिओ व बोलेरो या वाहनाचा समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात एकूण सात जण जखमी झाले असून यामध्ये पाच महिलांचा समावेश असून यातील चालकासह एका महिला गंभीर जखमी झाल्याने त्यांना नगर येथे हलवण्यात आले होते. या प्रकरणी अज्ञात स्कार्पिओ गाडीचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, काल शुक्रवार दि ०६ रोजी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बुलेरो गाडी क्र एमएच १६, ए. टी.२२१९ या गाडीचा चालक तौफिक हसन शेख हा जामखेड शहरातील जगदंबा सांस्कृतिक कला केंद्रातील महिला कलावंताना घेऊन ईट (ता. भूम, जि. उस्मानाबाद) येथे वारातीची सुपारी घेऊन चालला होता. याच दरम्यान खर्डा गावाजवळील आनंदवाडी शिवारात खर्ड्याकडून जामखेडकडे येत असलेल्या स्कर्पिओ गाडी क्रमांक एम. एच १६ बी. एच १९५१, हीने बोलेरो गाडीला जोराची धडक दिली. या अपघातात कलावंत घेऊन चाललेल्या गाडीचा चालक तौफिक हसन शेख याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली तर दिपाली दिलीप जाधव रा. खांडवी या देखील अपघातात गंभीर जखमी झाल्याने या दोघांना तातडीने पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले. तसेच याच बोलेरो गाडीतील रंजना चव्हाण , ललिता जाधव, अंकिता जाधव सर्व रा. जामखेड हे देखील जखमी झाले आहेत. तसेच धडक दिलेल्या स्कार्पिओ गाडीचा चालक (नाव माहीत नाही) हा देखील जखमी झाला आहे. असे या अपघातात एकुण सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने खर्डा येथील डॉ बिपीन लाड यांनी आपल्या रुग्णवाहिकेतुन खाजगी व जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमींवर वैद्यकीय अधिकारी डॉ युवराज खराडे यांनी उपचार केले. या अपघाता प्रकरणी अंकिता जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून काळ्या रंगाच्या स्कार्पिओ चालक (नाव माहीत नाही) याच्या विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. अजय साठे हे करत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post