माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- नगर तालुक्यातील जेऊर येथील आठवडे बाजार मुख्य रस्त्यावर भरत असल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असून नागरिकांचे हाल होत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, नगर तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणुन जेऊरची ओळख आहे. जेऊर गावांतर्गत बारा वाड्या येत असल्याने येथील आठवडे बाजारही मोठा भरत असतो. शनिवारी भरणारा बाजार सिना नदिच्या पात्रात भरत होता असतो. सद्यस्थितीत सिना नदीला पाणी वाहत असल्याने बाजार हा जेऊर गावात तसेच ससेवाडीला जाणा-या रस्त्यावरच भरत आहे.
रस्त्यावर भरणा-या बाजारामुळे येथे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. जेथे बाजार भरतो त्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे येथील नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. परिसरातील ससेवाडी, बहिरवाडी, डोंगरगण, धनगरवाडी, आढाववाडी, ईमामपुर या छोट्या गावांनी आठवडे बाजार भरत नाही. त्यांना ही भाजी पाला व इतर खरेदिसाठी जेऊरच्या आठवडे बाजारलाच यावे लागते. येथे फळवाले, भाजीपाला विक्रेते, मिठाईवाले, धान्य विक्रेते व्यापारी मोठ्या संख्येने येत असतात.
लाखोंची ऊलाढाल होणा-या आठवडे बाजाराची जागेअभावी दैना झालेली पाहावयास मिळत आहे. रस्त्यावर भरणा-या बाजारामुळे वाहतुकीची कोंडी होवुन नागरिकांचे हाल होत असल्याबाबत ससेवाडी ग्रामस्थांनी यापुर्वी जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील दिलेले आहे.
जेऊर गावाला बाजारच्या जागेचा प्रश्न अनेक वर्षांपासुन भेडसावत आहे. आठवडे बाजार साठी पर्यायी जागा शोधने हे ग्रामपंचायत समोर एक आव्हानच आहे. बाजारच्या दिवशी वाहने ही अस्ताव्यस्त लावल्याने वाहतुकिच्या कोंडीत भरच पडत आहे. तरी आठवडे बाजार रस्त्यावरुन हटविण्यात यावा तसेच स्वच्छ परिसरात बाजार भरविण्यात येण्याची मागणी ग्रामस्थांकडुन होत आहे.
पर्यायी जागेसाठी व्यापारी नागरिकांचे असहकार्य
ग्रांमपंचायत कार्यालयाच्या पुढाकारातुन जेऊर गावचा बाजार बायजामातेच्या टेकडीशेजारी बहिरवाडी चौकात भरविण्यात आला होता. परंतु एका बाजारानंतर व्यापारी तसेच गावातील नागरिकांनी हि सहकार्य न केल्याने बाजार परत पहिल्याच जागेवर भरत आहे..
Post a Comment