माय अहमदनगर वेब टीम
पुणे : राज्य सरकारने शेतक-यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही कर्जमाफी फसवी असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस फसवत आहे. काँग्रेस नेत्यांच्या साखर करखान्यावरील जे दोनशे कोटीचे कर्ज आहे ते वाचविण्याकरता ही कर्जमाफी केली गेली असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केला आहे.
यापूर्वीच्या सरकारने जवळपास सर्व कर्ज माफ केले आहे. त्यामुळे ही सरसकट कर्जमाफी नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. नागपूरच्या अधिवेशनातही आम्ही शेतकरी कर्जमाफीची मागणी लावून धरली होती. राष्ट्रपती राजवट असताना राज्यपालांनी जी घोषणा केली होती तशीच ही योजना आहे. त्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही. त्या मागणीकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून कर्जमाफी घोषित केली. सातबारा कोरा करू, मला शेतक-यांचे अश्रू पुसायचे आहेत, असे उध्दव ठाकरे म्हणाले होते, याचीही त्यांनी आठवण करून दिली.
Post a Comment