केडगावकरांची प्रतीक्षा संपली ; बससेवा होणार सुरू


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर -

बऱ्याच दिवसांपासूनची केडगाव करांची शहर बससेवेची प्रतीक्षा आता संपली असून उद्या शुक्रवार पासून केडगाव ते निर्मलनगर बस सुरू करण्यात येणार आहे. तसेच भिंगार साठीही महिनाभरात बससेवा सुरू होणार असल्याची माहिती दीपाली ट्रान्सपोर्टचे संचालक प्रा. शशिकांत गाडे यांनी दिली.

दीपाली ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून जुलैपासून नगर शहरात बससेवा दिली जात आहे. बससेवेचा शुभारंभ तत्कालिन ना. राधाकृष्ण विखे पाटील, तत्कालिन पालकमंत्री ना. राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, शिवसेना उपनेते अनिल राठोड, महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते करण्यात आला होता. आत्तापर्यंत शहर बससेवा निर्विघ्न सुरु असून उत्स्ूर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच नगरकरांच्या खिशाला बसणारी झळ, अ‍ॅपे-रिक्षा चालकांची होणारी अरेरावी बंद झाल्यामुळे बसने प्रवास करणार्‍यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
सुरुवातीला 11 बसेसच्या माध्यामातून बसस्थानक ते निंबळक, बसस्थानक ते इंजिनिअरिंग कॉलेज व बसस्थानक ते र्निलनगर पर्यंत बससेवा सुरु करण्यात आली. आता पुन्हा नव्याने तीन बसेस नगरकरांच्या सेवेसाठी दाखल झाल्या आहेत.
या तीन नवीन बसच्या माध्यमातून केडगावरांसाठी शाहूनगर-माळीवाडा बसस्थानक-र्निमलनगर अशी बससेवा सुरु करण्यात येणार आहे. तसेच तिच बस निर्मलनगर-माळीवाडा बसस्थानक-शाहूनगर अशी सुरु राहणार आहे. या बससेवेमुळे केडगाकरांचा ताण हलका होणार आहे. तसेच अवाजवी आर्थिक भुर्दंडही सोसावा लागणार नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post