महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निमगाव वाघाला शनिवारी निवड चाचणीचे आयोजन
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर तालुका तालिम सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने होणार्या 63 व्या राज्यस्तरीय वरिष्ठ गादी-माती अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब लढत 2019 कुस्ती स्पर्धेसाठी नगर तालुक्यातील निमगांव वाघा येथे शनिवार दि.7 डिसेंबर रोजी निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवड चाचणी स्पर्धा नगर तालुका तालिम सेवा संघाच्या वतीने घेण्यात येणार असून, नगर तालुक्यातील मल्लांना स्पर्धेच्या ठिकाणी सकाळी 8 वा. वजनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांनी केले आहे.
स्पर्धेच्या उद्घाटना प्रसंगी जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै.वैभव लांडगे, काशीनाथ पळसकर, पै.बाळासाहेब दुसुंगे, पै.बाळू भापकर, अॅड.अभिषेक भगत, सुभाष नरवडे, किसन वाबळे, उत्तम कांडेकर उपस्थित राहणार आहे. या राज्यस्तरीय वरिष्ठ गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92 व 97 तर 125 किलो वजनगट महाराष्ट्र केसरीसाठी निवड चाचणी स्पर्धा होणार आहे. अधिक माहितीसाठी पै.नाना डोंगरे मो.नं. 9226735346 यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.
Post a Comment