प्लास्टिक वापरणाऱ्यांवर महापालिकेकडून पुन्हा कारवाई ; 42 हजारांचा दंड वसूल


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या वापराविरोधात कारवाईसाठी महापालिकेची पथके पुन्हा एकदा सज्ज झाली आहेत. व्यापार्‍यांच्या आडकाठीमुळे थांबलेली कारवाईही पुन्हा सुरू झाली असून, सोमवारी (दि.30) एकाच दिवसांत मनपाने 42 हजारांचा दंड वसूल केला आहे.

काही दिवसांपूर्वी बाजारपेठेत कारवाईवेळी व्यापार्‍यांनी पथकातील कर्मचार्‍यांना अरेरावी केली होती. दंड भरण्यास नकार देत कर्मचार्‍यांना हुकसकावून लावले होते. व्यापारी एकत्र येवून दंडात्मक कारवाईला विरोध करत होते. या प्रकरणी दोन व्यापार्‍यांविरोधात गुन्हाही दाखल झालेला आहे. मात्र, या घटनेमुळे काही दिवस कारवाई थंडावली होती.

सोमवारपासून पुन्हा कारवाईला सुरूवात झाली आहे. मोची गल्ली परिसरात पथकाने कारवाई करत एकाच दिवसांत तब्बल 42 हजारांचा दंड वसूल केला असल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक राजकुमार सारसर यांनी दिली. मनपाची पथके पुन्हा कार्यरत झाल्यामुळे व दंडात्मक कारवाई कठोरपणे होत असल्याने व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post