शेतीच्या वादातून खुनाचा प्रयत्न
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – शेत जमीन वाटपाच्या वादातुन दोघांनी शिवीगाळ, मारहाण करीत आपल्याच भावाचा खुन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना अकोले तालुक्यातील रूंभोडी येथील शेत जमीन गट क्र. 55 मध्ये शुक्रवारी (दि.13) घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सुरेश काशिनाथ देशमुख (वय 64, रा. रूंभोडी, देशमुख मळा, गोठा वस्ती, ता. अकोले) यांचे शेतजमिनीच्या वाटपावरून त्यांचा भाऊ माणिक काशिनाथ देशमुख याच्याशी वाद होते. याच वादातुन शुक्रवारी (दि.13) सुरेश देशमुख हे शेत ट्रक्टरच्या साह्याने नांगरत असताना माणिक व त्याची पत्नी सौ. सुनीता तेथे आले व तु येथे नांगरायचे नाही, असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करून माणिक याने त्याच्याकडे असलेले बाटलीतील विषारी औषध सुरेश याच्या तोंडात ओतुन खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी अकोले पोलिसांनी सुरेश देशमुख यांच्या फिर्यादीवरून भारतीय दंड विधान कलम 307, 323, 504, 506 (34) प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असुन अधिक तपास पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे हे करीत आहेत.
Post a Comment