अतिवृष्टी : शेतकर्यांप्रमाणे मेंढपाळांना नुकसानभरपाई द्या



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - अतिवृष्टीमुळे मृत पावलेल्या शेळ्या-मेंढ्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी याबाबतचे निवेदन नांदगाव ( ता. नगर) येथील सरपंच सुनिता सरक यांनी तहसीलदार उमेश पाटील यांना दिले .

अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान झालेले आहे. त्यांचे पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात आहे. त्याच धर्तीवर मेंढपाळांना ही त्यांच्या अतिवृष्टीमुळे मृत पावलेल्या शेळ्या मेंढ्यांची नुकसान भरपाई द्यावी. मेंढपाळ यांचे संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह हा त्यांच्या मेंढपाळी च्या व्यवसाय वरच अवलंबून आहे. सदर व्यवसाय हा सर्वस्वी निसर्गावर अवलंबून आहे. सदरच्या व्यवसाया शिवाय त्यांच्याकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. नुकत्याच परतीच्या पावसाचा मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील बऱ्याच मेंढपाळांच्या पावसामुळे शेळ्यामेंढ्या मरण पावल्याने मोठे नुकसान झालेले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार यांना सुद्धा नुकसानीच्या पंचनामे करण्याचे आदेश देऊन सदर मेंढपाळांना शासनाकडून झालेल्या नुकसानीच्या बदल्यात नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत मिळावी असे निवेदन देण्यात आले आहे.

या अवकाळी अतिवृष्टी च्या पावसापासून संरक्षण व बचाव करण्यासाठी मेंढपाळांकडे कुठल्याही प्रकारची निवार्याची सोय नाही. रात्रंदिवस चाललेल्या पावसापासून शेळ्या मेंढ्या चे संरक्षण मेंढपाळांना करता आले नाही. त्यामुळे एकसारखे पावसात चिखलात उभे राहून शेळ्या मेंढ्या चे खुर(नख्या)सडण्याचे प्रमाण वाढून मरतुक झाली आहे. पावसापासून संरक्षण करण्यासाठी प्रत्येक मेंढपाळाकडे शेड असणं आवश्यक आहे. मेंढपाळांच्या शेड-वाघुर योजने साठी अहिल्या बाई होळकर शेळी मेंढी उद्योजक विकास महामंडळाचे अध्यक्षांकडे पाठपुरावा करणार असल्याचे महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनाचे अध्यक्ष सखाराम सरक यांनी सांगितले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post