मुकबधीर विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज - आ. संग्राम जगताप
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- माणसामध्ये देव पाहण्याची आपल्या संतांची शिकवण आहे. त्यानुसार दिव्यांगांना समाजाने मदतीचा हात दिला पाहिजे. मुकबधीर विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
नगरसेवक कुमार वाकळे यांच्या वाढदिवसानिमित्त सावेडी येथील मुकबधीर विद्यालयास अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, . नगरसेवक विनीत पाऊलबुधे, संपत बारस्कर, डॉ. सागर बोरुडे, अविनाश घुले, नगरसेविका मीनाताई चव्हाण, माजी नगरसेवक निखील वारे, बाळासाहेब पवार, दादासाहेब दरेकर, योगेश चिपाडे, मोहन गाडे, सारंग कराळे, सुरेश आडसूळ, अमीत खामकर, शरद महापुरे, दिलीप जगधने, संतोष काळे, विशाल वाकळे, प्रविण म्हस्के, संतोष वाटमोरे, निखील वाकळे, वैभव शिंदे, मुन्ना शेख, राम काते, नवनाथ कोलते, सनी वाकळे, रमेश वाकळे, प्रशांत बेल्हेकर आदी उपस्थित होते.
आ. जगताप पुढे म्हणाले, आजच्या युवा पिढीने सामाजिक उपक्रम राबवत आपल्या कामाचा ठसा उमटवला पाहिजे. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व नगरसेवक कुमार वाकळे हे नेहमीच प्रभागातील विकासकामांबरोबर सामाजिक उपक्रम राबविज असतात. त्यांचा आदर्श आजच्या युवा पिढीने घेतला पाहिजे. नगरसेवक कुमार वाकळे म्हणाले, वाढदिवस हा सामाजिक उपक्रमाने साजरा व्हावा यासाठी गेल्या ६ वर्षापासून सामाजिक भावनेतून मुकबधीर विद्यालयास अन्नधान्य देण्याचे काम करत आहे. याशिवाय वृक्षारोपण व रक्तदान शिबीरे आयोजित केली जातात. राजकारणात सामाजिक उपक्रमांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.
Post a Comment