शिर्डीत मोबाईल चोर जेरबंद
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - शिर्डी येथील फ्रेंडस मोबाईल शॉपी फोडून 2 लाख 53 हजार रुपयांचे मोबाईल चोरणारे दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोेलिसांना अटक करण्यात यश आले आहे. किरण ज्ञानदेव सदाफुले (वय 21, रा. प्रसादनगर, शिर्डी ता.राहाता जि.अहमदनगर) याला अटक करण्यात आले असून, राजु अशोक माळी (रा. गणेशनगर, शिर्डी) हा फरार झालेला असल्याने पोलिस यश घेत आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, फे्ंरडस मोबाईल शॉपी (शिर्डी) येथे शॉपीचे छताचा पत्रा कापून आतील 18 वेगवेगळ्या कंपन्यांचे 2 लाख 53 हजार रुपयांचे मोबाईल अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची फिर्याद शिर्डी पोलिस ठाण्यात मंगेश भागवत लांडगे (रा. डोर्हाळे ता.राहाता) यांनी दिली होती. त्या गुन्ह्यासंबंधी तपास सुरु असता, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार किरण सदाफुले याला मोठ्या शिताफिने पकडण्यात आले. सदाफुले याच्याकडून 82 हजार रुपये किंंमतीचे 8 मोबाईल जप्त केलेे. अन्य चोरीस गेलेले 10 मोबाईलबाबत चौकशी केली असता, ते मोबाईल राजु माळी यांच्याकडे असल्याचे सदाफुले याने सांगितले. त्या माहितीनुसार पोलिस माळी यांचा शोध घेत आहेत.
पो.नि. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.शिशिरकुमार देशमुख, पोहेकाँ मनोज गोसावी, विजयकुमार वेठकर, रविंद्र कर्डिले, संतोष लोंढे, दत्ता गव्हाणे, रविकिरण सोनटक्के, सचिन आडबल, दिपक शिंदे, विजय ठोंबरे, राहुल सांळुके, कमलेश पाथरुट, रोहित मिसाळ, चोपोहेकॉ संभाजी कोतकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
Post a Comment