माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर शहरातील एका शाळेतील शिपायाने 12 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केला. याप्रकरणी शिपायाविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात 'पोस्को' अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पालकांकडून संताप व्यक्त होत असून त्या शिपायावर कडक कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.
सविस्तर असे की, 12 वर्षीय विद्यार्थिनी शहरातील एक शाळेत येथे शिक्षण घेते. तेथे काम करणारे शिपाई लगड (पूर्ण नाव माहित नाही) यांनी सदर विद्यार्थिनीशी दोन वेळेस लज्जास्पद वर्तन केले. काल दुपारी शिपाई लगड यांनी लज्जास्पद वर्तन केल्यानंतर मुलीने घडलेली हकीकत तिच्या आईला सांगितली. त्यानंतर रात्री उशिरा पीडित मिलीची आई व नातेवाईकांनी तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली.
तोफखाना पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून शिपाई लगड (पूर्ण नाव माहीत नाही) याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडे हे करीत आहेत.
Post a Comment