'त्यांच्या' वक्तव्याला महत्व देण्याची गरज नाही - ना.बाळासाहेब थोरात
माय अहमदनगर वेब टीम
संगमनेर - आम्ही कायम काँग्रेसच्या विचारांशी प्रामाणिक राहिलो. निष्ठा व तत्वे यामध्ये कधीही तडजोड केली नाही. त्यांनी मागील साडेचार वर्षात काँग्रेसमध्ये राहून केलेले पक्षविरोधी काम हे सगळया महाराष्ट्राने पाहिले आहे. तेव्हा आता त्यांच्या वक्तत्यांना फार महत्व देण्याची गरज नाही असा टोला लगावत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्याची खिल्ली उडविली आहे.
माध्यमांशी बोलतांना प्रदेशाध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले कि, त्यांना पक्ष बदलण्यासाठी सगळा महाराष्ट्र ओळखतो आहे. त्यांच्या वक्तव्याला मीच काय कोणीही महत्व देत नाही. आपण संकटाच्या काळात कायम काँग्रेस पक्षाच्या सोबत राहिलो. कायम काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून पक्ष सोडण्याचा विचार ही कधी मनात आला नाही. अडचणीच्या काळात काम केले आणि करत राहणार आहे. उलट मागील साडे चार वर्षांत पक्षाने त्यांना विरोधी पक्षनेतेपदासह अनेक पदे दिली. त्यांनी कसा पक्ष वाढविला, कसे पक्षविरोधी काम केले, हे सगळया जनतेने पाहिले आहे. त्यामुळे आता ते काय बोलतील याला फार महत्व देण्याची गरज नाही. आता ते जिथे गेले आहेत तिथे त्यांनी अल्पावधीतच मित्र वाढविले आहेत. ही त्यांची जुनी कार्यपध्दती आहे. आता सत्ता नाही विरोधी पक्षात असल्यामुळे ते काहीही बोलतील. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर जास्त बोलण्याची गरज नाही.
Post a Comment