वृक्षसंवर्धन होणे काळाची गरज : कदम


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- आज जगात प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत असून, त्यामुळे पाऊस अनियमित झाला आहे. प्रकृतीचे संवर्धन करणे आवश्यक आहे. परंतु केवळ झाडे लावून त्याचा उपयोग होत नाही. त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यासाठी झाडे लावा झाडे जगवा हा मूलमंत्र जपला पाहिजे. असे प्रतिपादन सरपंच जालिंदर कदम यांनी केले.
ग्रामीण विकास व अध्यण केंद्र आणि समाजकार्य संशोधन (सीएसआरडी)संस्थेच्या वतीने नगर तालुक्यातील मांजरसुंबा येथे 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे संचालक सुरेश पठारे यांच्या मार्गदर्शानाखीला शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. सुरेश मुगुटमल, प्रा. विजय संसारी, प्रमुख पाहुणे बाबा खरात आदीसंह प्राध्यापक, विद्यार्थी, ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून गावात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, प्लास्टिक निर्मूलनासह विविध उपक्रमण राबविले जाणार आहेत. तसेच सामाजिक ऐक्य, मानसिक आरोग्य, महिला सक्षमीकरण इत्यादी विषयावर व्याख्याने होणार आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post