आय. टी आयडॉल स्पर्धेमुळे गुणवत्तेला वाव - प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर
माय अहमदनगर वेब टीम
पारनेर -पारनेर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अॕण्ड सायन्स, महाविद्यालयात संगणकशास्र विभागाच्या वतीने आय. टी आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. आहेर पुढे म्हणाले, आजचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे आहे. आपल्यामध्ये कौशल्य विकास झाला तरच आपल्याला चांगली नोकरी मिळू शकते. त्यामुळे अशा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन प्रत्येकाने कौशल्य विकास करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अशा उपक्रमांचे आयोजन आवश्यक असते. जेणेकरुन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व कौशल्य विकास होण्यास मदत होते. संगणक शास्र विभागाचे समन्वयक डॉ. सुधीर वाघ यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.
या स्पर्धेमध्ये एकूण २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सदर स्पर्धेत राधेश्याम गायकवाड याने प्रथम क्रमांक पटकावला तर संकेत ठाणगे याने द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला तर प्रांजली घोडके हि विद्यार्थीनी तृतीय क्रमांक विजेती ठरली या स्पर्धेत परीक्षक म्हणून प्रा. विरेंद्र धनशेट्टी यांनी काम पाहिले.
या स्पर्धेचे आयोजन संगणकशास्त्र विभागाने विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी करण्यात आले होते असे संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा. शिवाजी शिंदे यांनी सांगितले.
या स्पर्धेचे आयोजन संगणकशास्त्र विभागातील प्रा. चितळकर मंगेश, प्रा. विद्या फंड,प्रा.सागर तांबे,प्रा. झावरे माधुरी,प्रा.सातपुते योगिनी, प्रा.मते चैताली,प्रा. धस अनंत, प्रा.ज्योती भोसले यांनी केले.
Post a Comment