मंत्रिपद न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांचा राडा
माय अहमदनगर वेब टीम
पुणे- पुण्यातील भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे हे तीन व वेळा निवडूण आले आहेत. तरीदेखील त्यांना मंत्रीपद न दिल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि पुण्यातील शिवाजीनगर येथे असलेल्या काँग्रेस कार्यलयाची तोडफोड केली. यावेळी संतत्प कार्यकर्त्यांनी इमारतीच्या काचा फोडल्या तसेच, मुख्य दालनातील खुर्च्या, टेबल आणि इतर वस्तुंचीही नासधुर केली.
महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला. यात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली तर जुन्या निष्ठावंताना डावलण्यात आले. अनेकवर्षे पक्षासाठी काम करुनही मंत्रिपद न मिळाल्यामुळे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. यातच आता पुण्यातील भोरचे आमदार संग्राम थोपटेंना मंत्रिपद न मिळाल्यामुले त्यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसले. कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनात प्रचंड तोडफोड केली आहे. तसेच, येत्या काळात जिल्ह्यातून काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिकाही कार्यकर्त्यांनी घेतली.
Post a Comment