अभिनेत्री रविना टंडन, खान, भारती अडचणीत


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - डिस्ट्रीट रेव्ह. अ‍ॅण्ड पास्टर्स असोशिएशन नगरच्या वतीने बॅक बेंचर्स या कार्यक्रमात फराह खान, रविना टंडन, भारती सिंह यांनी ख्रिश्चन धर्मीयांच्या भावना दुखावल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी येथील ख्रिश्चन समाजाने पोलिस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या निवेदनाच्या प्रती तोफखाना पोलीस ठाण्यात देण्यात आल्या आहेत.

पोलिस अधिक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनावर शमुलेक भिंगारदिवे, दिपक पवळे, अशिष सावंत, नाईक, जे.डी.सोनवणे, अनिल घोडेकर, अशोक मकासरे, मधुरक पवार, राजु गोडृ, चंद्रकात पिल्ले, शामराव भोसले, डेव्हीड ससाणे, अनिल उजगरे, अशोक पडळे, सुनिल वाघमारे, प्रमोद शिरसाठ, तानाजी पाडळे, अजय देठे, जोन्स साने, जॉन वाघमारे, लिंबाजी साळवे, अनिल पंडित, किरण पगारे, संजय वैरागळ, विजय कर्डक, रविंद्र पंचमुख, मोगेस नेटके, रघुनाथ हुंबरे आदींच्या सह्या आहेत.




निवेदनात म्हटले आहे, बँचर्स या फ्लीपकार्ट प्रायोजित कार्यक्रमात फराह खान, भारती सिंह व रविंना टंडन ख्रिस्त धर्मियांच्या पवित्र असणार्‍या बायबल मधील हालेलूया या पवित्र शब्दाबद्दल चुकीचे मत व्यक्त करुन तसेच या पवित्र शब्दचा चुकीचा काढून ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखविल्या आहेत. ऐन नाताळाच्या पवित्र सणाच्या आनंदा विर्जन घालणारा हा प्रकार निंदात्मक आहे. यातुन ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावल्या असून याच्यावर त्वरीत कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post